भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार : पंतप्रधान मोदी

14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day says PM Narendra Modi

भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून हे सांगितले आहे. या दिवशी आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना द्वेष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, 14 ऑगस्ट रोजी 'फाळणी वेदना दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'ब्रिटिश इंडिया' ची १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी झाली आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.