पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज पुल ‘या’ कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार!

The Chatrapati Sambhaji Maharaj Bridge, a wooden bridge which is constantly busy in Pune city, will be closed for traffic from August 24 to September 12 from 11 pm to 6 am due to Metro work.

पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज पुल ‘या’ कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार!

पुणे मेट्रोच्या कामासाठी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज पुल म्हणजेच लकडी पुल २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान या पुलावरील वाहतूक रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर कराल?

१. टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांनी खालील मार्गाचा वापर करावा.
- टिळक चौक, केळकर रोड, माती गणपती, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरी वाडा, रमणबाग शाळा, वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंधर्व पुलावरून डावीकडून वळून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक

२. खंडोजीबाबा चौकातून टिळकरोड कडे जाण्यासाठी नागरिकांनी खालील मार्गाचा वापर करावा.
- खंडोजी बाबा चौक, कर्वे रोडने शेलार मामा चौक, यशवंत राव चव्हाण चौक, रस शाळा, एस एम जोशी पूल, गांजवे चौक, टिळक चौक किंवा शास्त्री रोडने दांडेकर पुलावरून वाहने जाऊ शकणार आहेत.