आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

Ayurvedacharya Dr. Balaji Tambe passed away at the age of 81 in Pune.

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन
Photo Credits: Google

आयुर्वेदाचार्य तसेच मेकॅनिकल इंजिनीअरची डिग्री असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे यांचे पुणे येथे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘सकाळ’च्या ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.