पूर्वेकडील ऑक्सफर्ड पुणे

Pune is the Oxford of the East was addressed by Jawaharlal Nehru. After India's independence, Pune has proved its dominance in the field of education.

पूर्वेकडील ऑक्सफर्ड पुणे
Photo Credits: Google

पुणे म्हणजे पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे पं. जवाहरलाल नेहरू यांनी संबोधले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याने शिक्षण क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पुण्यात शिकता यावे यासाठी देशभरातून, परदेशातूनही विद्यार्थी पुण्यात येत असतात. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय संरक्षण प्रोबोधिनी म्हणजेच एन.डी.ए, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या आणि अश्या अनेक संस्थांमुळे पुणे जगाच्या पाठीवर नामांकित झाले.

प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण हे देखील पुण्यात अतिशय उत्तम दर्जाचे आहे. पुणे महानगर पालिका देखील अनेक शाळा चालवते. पुण्यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा केंद्रीय बोर्ड या संस्थांशी संलग्न आहेत. जपानी भाषा शिकण्यासाठी देखील पुणे हे अतिमहत्वाचे केंद् म्हणून ओळखले जाते.