युनिव्हर्सल पास कसा काढाल?

How to apply for Universal Travel Pass in Maharashtra

युनिव्हर्सल पास  कसा काढाल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसींचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा केली. युनिव्हर्सल पासच्या माध्यमातून नागिरकांना प्रवास करता येणार आहे. कसा आहे युनिव्हर्सल पास आणि तो कसा तयार करून घेयचा ह्याची माहिती जाणून घेऊया. 

१. सर्वप्रथम हा पास काढण्यासाठी लसींचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे.

२. ह्या पास साठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.

३. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/ ह्या वेबसाईट वर जा.

४. त्यानंतर Universal Pass For Double Vaccinated Citizens ह्या पर्यायावर क्लिक करा.

५. नंतर Page Expire होण्याच्या आत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला एक ओ.टी.पी. प्राप्त होईल.

६. हा ओ.टी.पी तिथे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.

७. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश प्राप्त होईल.