राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन

On the eve of 15th August, President Ramnath Kovind addressed the nation. On the background of the corona, he said, even though the intensity of the corona has decreased, the effect of the corona virus is not over yet.

राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे तरीसुद्धा कोरोना विषाणूचा प्रभाव आजून संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट आमच्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, प्रशासक आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रित केली जात आहे असे राष्ट्रपती म्हणाले. आपल्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कमी वेळेत कोरोनाची लस तयार केली, असंही राष्ट्रपतींनी आवर्जून म्हटलं. देशातील नागरिकांनी लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करताना राष्ट्रपती म्हणाले, प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी आणि इतरांनाही प्रेरित करावे.