मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी - आशिष शेलार

Shiv Sena leaders say that the Chief Minister does not know things. Therefore, the Chief Minister should now declare me irresponsible, said Ashish Shelar.

मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी - आशिष शेलार
Photo Credits: Google

कोरोना काळात मुखमंत्री म्हणायचे मी जबाबदार. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. त्याच बरोबर राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’ अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. किरीट सोमय्या यांना ज्या पद्धतीने स्थानबद्ध करण्यात आले त्या एकूण सर्व घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.