केंद्राचा मोठा निर्णय : प्लास्टिक वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी

The central government has taken a big decision. The central government has banned single use plastics from July next year.

केंद्राचा मोठा निर्णय : प्लास्टिक वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुढच्या वर्षी जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचने नुसार पॉलिथीन पिशव्यांची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पॉलिथीन पिशव्यांच्या जाडीवरील बंदी दोन टप्प्यात लागू होणार असल्याचे केंद् सरकार कडून जारी करण्यात आले आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे नदी दुषित होते, हे प्लास्टिक भटके प्राणी खातात आणि तसंच  काही लोकं प्लास्टिक मोकळ्या हवेत  जाळत असल्याने प्रदुषण वाढते व श्वसनाचे विकार संभवतात.