रात्रीस खेळ चाले ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Due to the restrictions imposed in the second wave of Corona, the popular series 'Ratris Khel Chale 3' was temporarily shut down. But now it is coming to the audience once again.

रात्रीस खेळ चाले ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Photo Credits: Zee Marathi

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लागलेल्या निर्बंधांमुळे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय ठरलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले ३' तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या मालिकेचे पहिले दोन्ही सीजन अतिशय लोकप्रिय झाले. ह्या मालिकेची कथा एका वाड्याभोवती फिरत असल्याने निर्मात्यांना ह्या मालिकेचे चित्रीकरण परराज्यात करणे शक्य झाले नाही. परंतु, लवकरच ह्या मालिकेचे चित्रीकरण सुरु होणार असून हि मालिका परत एकदा म्हणजेच १६ ऑगस्टपासून सोम. ते शनि. रात्री ११ वा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.