वेबसाईटसाठी डोमेन घेताय? मग आधी हे वाचा..

A domain name is an identification string that defines a realm of administrative autonomy, authority or control within the Internet.

वेबसाईटसाठी डोमेन घेताय? मग आधी हे वाचा..

मागील काही दिवसांमध्ये सर्वच व्यवसाय हे ऑनलाईन होत आहेत. वेबसाईट चे महत्व आपल्याला ह्या लॉकडाऊन मुळे आपल्याला कळले आहे. डोमेन नेम हा शब्द आता आपल्या सर्वांचाच परिचयाचा झाला आहे. हे डोमेन नेम तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन ओळख असते. हे डोमेन नेम घेताना आपण काही गोष्टींचा विचार करायला हवा. डोमेन नेम घेताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेयला हवी ते आपण पाहुयात.

१. सर्व प्रथम आपले डोमेन https://www.domaintoaster.in/ किंवा https://in.godaddy.com/  ह्या वेबसाईटवर शोधा.

२. जर डोमेन खरेदी करायला उपलब्ध असेल तर त्या डोमेन चे मागील रेकोर्ड तपासून घ्या. ते तपासण्यासाठी checkpagerank.net ह्या वेबसाईटचा वापर करा.

३. जर आपल्या डोमेन चा Spam Score हा ४ पेक्षा जास्त असेल तर शक्यतो ते डोमेन खरेदी करण्याचे टाळा. Spam Score चा अर्थ असा आहे कि, ह्यापूर्वी कोणीतरी हे डोमेन खरेदी केले असावे आणि त्यावर चुकीच्या पद्धतीने SEO केले असू शकते.

४. आपल्याला खरेदी करायचे असलेले डोमेन आपण Google अथवा Facebook वर सुद्धा सर्च करून पाहू शकता.

५. जर आपण खरेदी करत असलेले डोमेन हे वरील सर्व पर्याय तपासून योग्य असेल आणि तुम्हाला ते सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही डोमेन ३ वर्षे साठी खरेदी करू शकता.